श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिंगणापूर
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही.
संतांची कर्मभूमी असलेल्या ह्या गावात श्री शनिदेवच स्वामी,मालक,अधिपती सर्व काही आहे.इथे असे म्हणतात कि आपण जशी कृती - कर्म करू तसे फळ तत्काळ श्री शनिदेव देतो.अशा या जग प्रसिध्द गावात दरवाजा,खिडकी,साखळ दंड,कडी,कोयंडा, कपाट,बॉक्स,पेटी,कुलूप,किल्ली वगैरे चा काहीही उपयोग व प्रयोग कुणीही करत नाही.कारण आसं म्हणतात कि हा श्री शानिदेवा चाच आदेश आहे कुलूप लावू नका.आणि गावातील लोकच सांगतात कि आमच्या घराचे रक्षण करणे हे श्री शनिदेवाच्या अधिकारातील आहे.ते असे मानतात कि श्री शनिदेव स्वत: त्यांना सांगतो.
'' मी २४ तास तुमच्या घराचे,शेतीचे,मालाचे रक्षण करीन,तुम्ही निश्चिंत रहा,कुठलीही काळजी करू नका अन तुम्हाला हि काही होणार नाही,तुमचे रक्षण हे माझे कर्तव्य होय.''
म्हणूनच जगभर ह्या गावाचा उल्लेख होतो.तसे इतरत्र पहिले तर जगभर चोऱ्या होताहेत.कंपाउंड वर कुलूप,कुलूपवार कुलूप लावून सुध्दा चोर आरामात चोरी करून फरार होतो.पण शिंगणापूर मध्ये उलट चित्र आहे.सर्व उघडयावर, खुले आहे तरी चोरी होत नाही.कोणी चोरी करण्याचा प्रेयतन जरी केला तरी तो त्यात यशस्वी होत नाही.प्रस्तुत साक्षात्कार संपूर्ण गाव अनेक पिढ्यांपासून पहात आहे.येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनि���ेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
0 comments:
Post a Comment